Advertisement
उस्मानाबाद : राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. दरम्यान आज त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं आहे. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना अॅडमिट करून घेतल्याची, आजचा दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांपासून कैलास पाटील आमरण उपोषण करीत आहेत. आज त्यांच्या रक्त नमुन्यांच्या चाचण्याही केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे.
