Advertisement
पुणे : उदय सामंत यांनी काल 10 नवे उद्योग महाराष्ट्रात आल्याचा दावा केला होता. पण सर्व उद्योग महाविकास आघाडी सरकारच्याच काळात महाराष्ट्रात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह दाखवून दिलं. त्यासंबंधीची यादीच सुळे यांनी यावेळी माध्यमांसमोर वाचून दाखवली. तसंच मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघेही गेली सात वर्षे मंत्री राहिले आहेत. त्यामुळे किमान या दोघांनी तरी असे बेजबाबदार आरोप करू नये, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.
ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले उद्योग यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या, पंतप्रधानांची बैठक घ्या. आज जे आरोप प्रत्यारोप होतात ते महाराष्ट्रासाठी शोभणारे नाही, अशी नाराजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 'नितीन गडकरी पारदर्शक काम करतात, ते सर्वसमावेशक आहेत, सर्वांना सोबत घेऊन जातात. ते पक्ष बघत नाही, ते सर्वांचे काम करतात' असं म्हणत सुळे यांनी गडकरींचं कौतुक केलं.
'बच्चू कडू उगाच आरोप करत नाही, सत्तेत असणारे संवेदनशील आहेत, याच मनापासून स्वागत करते, मंत्रीच म्हणतात तुम्हाला खोके पाहिजे का ? पन्नास खोक्याची चर्चा आज वाड्या वस्त्यावर होत आहे. बच्चू कडू यांचे मी स्वागत करते, असंही सुळे म्हणाल्या.
