Advertisement
पुणे : 'उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो काही झाला . त्यावर मी काही बोलणार नाही, कारण शिमग्यावर काही बोलायचे नसते. शिमग्या शिवाय त्या मेळाव्यामध्ये काहीच नव्हतं', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मेळाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली असून एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. पहिली गोष्ट तर अशी मी दोन्ही भाषणं ऐकलं नाही. मी धम्मचक्र प्रवृतक दिनाच्या कार्यक्रमाला नागपूरमध्ये होतो. पण रात्री उशिरा मला दोन्ही मेळाव्याचा सारांश कळाला. एकनाथ शिंदे यांचे भाषण मी युट्यूबवर पाहिले. उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो काही झाला. त्यावर मी काही बोलणार नाही, कारण शिमग्यावर काही बोलायचे नसते. शिमग्या शिवाय त्या मेळाव्यामध्ये काहीच नव्हतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी अभिनंदन करतो. काल त्यांनी दाखवून दिलं शिवसेना कुणाची आहे. बीकेसी मैदानावर तुडुंब गर्दी भरली होती. या मैदानावर महाराष्ट्र भरातून लोक आली होती, असं म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
