#

Advertisement

Saturday, October 15, 2022, October 15, 2022 WIB
Last Updated 2022-10-15T10:54:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात मनसे नेत्यांकडून गेल्या आठवड्यात टीकेची झोड उठवली जात असताना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. सुरुवातीला आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या दोन बड्या नेत्यांची भेट होत असल्याची माहिती समोर येत होती. नंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचं मानलं जात होतं. पण या भेटीचे वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. काही जणांनी ही त्यांची वैयक्तिक कारणासाठी भेट असल्याचं म्हटलं आहे. 
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. या पोटनिवडणुकीत जवळपास सहा वेगवेगळ्या पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार पटेल यांच्याच काँटे की टक्कर बघायला मिळणार आहे. दोन्ही गटाकडून संपूर्ण ताकद लावली जात आहे. भाजप ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बाजूने असणारे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाच्या मार्फत भाजपची रणनीती आखली जाऊ शकते. या भेटीनंतर कदाचित ज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करु शकतात.