#

Advertisement

Monday, October 31, 2022, October 31, 2022 WIB
Last Updated 2022-10-31T12:18:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची 'दारू पे चर्चा', थेट अधिकाऱ्यांना विचारलं, घेता का?

Advertisement

बीड : कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या एका वेगळ्याच कारणेवरुन चर्चेत आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन संताप व्यक्त केला जात आहे.  शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. कृषी मंत्र्यानी मात्र अद्याप तशी परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं. यावरुन आधीच शेतकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. 
अतिृवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री चक्क दारूच्या गप्पा मारत असल्यामुळे बळीराजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. कृषी मंत्र्यांनी थेट जिल्हा अधिकारी यांना सर्वांसमोर विचारलं की, दारु घेता का? यावर जिल्हा अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे कधी कधी थोडी घेतो, असं उत्तर दिलं. जिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.