#

Advertisement

Monday, October 31, 2022, October 31, 2022 WIB
Last Updated 2022-10-31T12:28:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आमदारांची पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम : आमदार बबनराव लोणीकर

Advertisement

जालना : राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मात्र, आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून घराणेशाहीची उदाहरणे दिली जात आहेत. आमदारांची पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम आहे असे विधान भाजपचे माजी मंत्री आणि जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. 
भाजपच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जालन्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात बबनराव लोणीकर बोलत होते.
आमदारांची पोरं आमदार,खासदारांची पोरं खासदार, डॉक्टरांची मुलं डॉक्टर,वकिलांची पोरं वकील आणि पुढाऱ्यांची पोरं पुढारी हा निसर्गाचा नियम आहे. माझी इच्छा नसताना राहुल लोणीकर राजकारणात आला आणि त्याने चांगले नाम कमावले. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. मी खूप मोठा संघर्ष केला. संघर्षामुळे मला मंत्री होता आलं. जिल्ह्यात तीन मंत्री असताना अडचणी यायच्या. माझ्या विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे झाली, असे बबनराव लोणीकर म्हणाले आहे