#

Advertisement

Monday, October 31, 2022, October 31, 2022 WIB
Last Updated 2022-10-31T12:05:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला

Advertisement

मुंबई : 'प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू  आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला. 
बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावं, असं सांगितलं होतं. आता बच्चू कडू यांनी कुणासोबत सौदा केला, काय केलं, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे होते' असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सगळे जण गेले होते. रवी राणा यांची समजूत काढली. मी रागा रागात बोललो. दोघांनीही मान्य केलं की आम्ही रागामध्ये बोललो. त्यामुळे दोघांनी आता विकासासाठी काम करण्याचे ठरवले आहे' असंही फडणवीसांनी सांगितलं. 
'सरकारला अडचण निर्माण होईल, असं कोणतीही काम ते करणार नाही. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर पडदा पडला आहे' असंही फडणवीसांनी सांगितलं.