Advertisement
पुणे :
सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपली पकड मजबूत केली आहे. संघटनात्मदृष्ट्या
सोलापुरातील भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षम असल्याचे आगामी
निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व कायम असेल, अशी ग्वाही संघटनमंत्री शिवप्रकाशजी
यांना सोलापूर जिल्हा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे
यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी बैठक राष्ट्रीय
सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हा
कोअर टीमचा संघटनात्मक आढावाही घेतला, त्यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मणरावजी ढोबळे
यांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय स्थिती आणि भाजपची भक्कम ताकद तसेच आगामी
काळासाठी करण्यात येत असलेली तयारी याबाबतची माहिती दिली. याबाबत शिवप्रकाशजी
यांनीही समाधान व्यक्त केले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर,
लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश प्रभारी बाळा भेगडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री
मकरंद देशपांडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन
कल्याणशेट्टी, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम
सातपुते, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रदेश
कार्यकारणी सदस्य शहाजीभाऊ पवार, राजकुमार पाटील, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते
पाटील, शशिकांत चव्हाण आदि उपस्थित होते.

