#

Advertisement

Saturday, October 15, 2022, October 15, 2022 WIB
Last Updated 2022-10-15T10:47:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अंधेरीमध्ये लटकेंसोबत "डमी" उमेदवार

Advertisement

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ऋतुजा लटके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे, तर मुरजी पटेल यांना शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे.
महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला असला, तरी ठाकरेंनी या मतदारसंघातून डमी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ऋतुजा लटके यांच्यासह संदीप नाईक यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
संदीप नाईक ये युवासेनेचे पदाधिकारी आहेत, तसंच ते शिवसेनेचे अंधेरीमधले माजी नगरसेवकही होते. ऋतुजा लटके यांच्या अर्जाच्या तपासणीवेळी काही अडचण आली तर संदीप नाईक, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.