Advertisement
अमरावती: महाविकास आघाडीची सत्ता उलथावत एकनाथ शिंदे यांना आमदार बच्चू कडू यांच्यासह अन्य अपक्ष आमदारांना पाठींबा दिला होता. बच्चू कडू यांना मंत्रीपदाची ऑफर मिळेल असे बोलले जात असताना त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज होते. मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपद मिळेल] अशी शक्यता असली तरी त्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळी चूल मांडल्यानंतर बच्चू कडू हे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होते, मात्र बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ स्थान मिळालेले नाही, मंत्रिमंडळात विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये लहानसा पक्ष आहे, आता मंत्रिमंडळ मंत्रीपद मिळाले नाही तर अडीच वर्षानंतर मिळेल असे उलट उत्तर बच्चू कडू यांनी दिलं, यावरून मंत्रिमंडळात विस्तार न झाल्याने बच्चू कडू यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.
बच्चू कडू यांनी नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेकदा माध्यमांशी बोलताना मंत्रीपदाविषयी जाहीरपणे भूमिका मांडली आहे. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे, नेमकं मंत्रीपद मिळणार कधी? याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यांनाच प्रतिप्रश्न केला. यावर बोलायला मी काय प्रमुख आहे का? असा सवाल बच्चू कडूंनी केला.
