#

Advertisement

Saturday, October 22, 2022, October 22, 2022 WIB
Last Updated 2022-10-22T12:38:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Advertisement



बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधणे शिवसेनेचे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चांगले भोवले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे. या घोषणेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 
बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या 70 कोटींच्या विकास कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आलं होतं. जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे आज जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची घोषणा केली.
जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. मुंबईत जाऊन त्यांची कधी भेट घेतली नाही. नुकत्याच केलेल्या उद्घाटनात कुठेही त्यांचा उल्लेख केला नाही. ही खंत वाटल्यामुळे यापुढे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली. 
तसंच, सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. अनेकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत, असंही धोंडीराम पाटील म्हणाले.
यावेळी संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव, बाळासाहेब पिंगळे, परमेश्वर सातपुते, विलास महाराज शिंदे, दिलीप गोरे, सुनील सुरवसे, सागर बहिर यांची उपस्थिती होती.