#

Advertisement

Tuesday, November 1, 2022, November 01, 2022 WIB
Last Updated 2022-11-01T11:06:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

120 महामंडळं कशी वाटायची? भाजप-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला

Advertisement

मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांची महामंडळ वाटपाबाबत बैठक पार पडली. यावेळी 120 महामंडळांची कशी वाटप करायची याची चर्चा झाली, असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली.
पावन गड बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती समन्वयक समितीची बैठक पार पडली. बैठकीला युती मधील ज्येष्ठ मंत्री सहभागी झाले होते. उदय सामंत, दादा भूसे, शंभूराजे देसाई, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळांचे वाटप आणि विविध समित्यांच्या नियुक्ती संदर्भात महत्वाची चर्चा झाली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी माहिती दिली. 
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही महामंडळ वाटपा बाबत चर्चा केली. 120 महामंडळ आहेत. त्यातील काही ठिकाणी अध्यक्ष नेमायचं आहेत. तर काही ठिकाणी उपाध्यक्ष तर काही ठिकाणी सदस्य नेमायचं आहे. सर्व अधिकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस घेतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. आज 120 महामंडळ व्याप्तीवर चर्चा झाली असली तरी कुणाला किती द्यायचे याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.