Team Lakshvedhi
Last Updated
2022-11-01T11:16:09Z
मी राजीनामा देतो फक्त...! अब्दुल सत्तार यांचं आदित्य ठाकरेंना 'चॅलेंज'
Advertisement
मुंबई : राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय करत आहेत असा सवाल सर्वच विरोधी नेते करत असल्याने सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली जात आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या सर्व आरोपांसंदर्भात वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी.
सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. यावरून विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीबाबत सर्व माहिती देणार असून राज्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाने पाहणी करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचेही सत्तार म्हणाले.