#

Advertisement

Tuesday, November 1, 2022, November 01, 2022 WIB
Last Updated 2022-11-01T11:22:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

गौतमी पाटीलच्या लावणीने पोरं घायाळ ; गर्दीमध्ये आढळला मृतदेह

Advertisement


सांगली: 'राया असं सोडून जायचं नाही' या गाण्यावर गौतमी पाटील थिरकली आणि बघता बघता पोरांना खुळ लावून गेली. सांगली जिल्ह्यातील बेडगेत गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांचा लावणीचा कार्यक्रम पार पडला. पण, या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केली. धक्कादायक म्हणजे, गर्दीमध्ये एका तरुणाचा मृतदेहही आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
सांगली जिल्ह्यातील बेडग इथं सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. लावणी कार्यक्रमात तुफान गर्दी झाली होती. तरुणांनी एकच गर्दी केल्यामुळे गोंधळ उडाला.
कार्यक्रम परिसराच्या बाहेर एक मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. दत्तात्रय विलास ओमासे असे मृत तरुणाचं नाव आहे. ओमासे हे गर्दीत खाली पडल्याने तुडविले गेले असण्याची शक्यता असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ओमासे यांच्या मृत्यूबाबत मिरज ग्रामीण पोलिसात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिक्षकांनाही भान उरलं नाही
जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून जमलेल्या काही तरुण कार्यक्रम पाहत होते. पण शाळेच्या कौलारू छताचा चुराडा झाला. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली आणि शाळेची कौले फुटली. एवढंच नाहीतर तार जाळीच्या कंपाऊंडचेही नुकसान झाले. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते. तेही झाडही कोसळले. या लावणीच्या कार्यक्रमाने शिक्षकांनाही भान उरलं नाही. या कार्यक्रमात चक्क शिक्षक ही नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे आयोजक आणि शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली आहे.