#

Advertisement

Wednesday, November 2, 2022, November 02, 2022 WIB
Last Updated 2022-11-02T13:29:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आदित्य ठाकरेंची तोफ सत्तारांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार !

Advertisement



मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आदित्य ठाकरे अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत, यानंतर आता आदित्य ठाकरे थेट सत्तारांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत.
आदित्य ठाकरे 7 नोव्हेंबरला बुलढाणा आणि सिल्लोडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यात सिल्लोडमध्ये त्यांची सभा होणार आहे. याशिवाय ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे अब्दुल सत्तार म्हणाले.