#

Advertisement

Wednesday, November 2, 2022, November 02, 2022 WIB
Last Updated 2022-11-02T13:10:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत जेल की बेल?

Advertisement

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये तुर्तास वाढ केली आहे. मात्र, जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. त्याच दिवशी राऊतांना जामीन मिळणार की नाही याचा फैसला होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. आज ईडीने लेखी उत्तर सादर केली. 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाने आदेश राखून ठेवला आहे.