#

Advertisement

Friday, November 18, 2022, November 18, 2022 WIB
Last Updated 2022-11-18T17:58:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बहुजन रयत परिषद राज्य कार्याध्यक्ष पदी ऍड. शुभा पिल्ले

Advertisement

पुणे : बहुजन रयत परिषद कायद्यात चालणारी संघटना आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांना ज्या काही कायदेशीर अडचणी येतील त्या सोडविण्याकरिता हक्काची वकील या नात्याने मी खंबीर आहे, असे बहुजन रयत परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष पदाची सुत्रे नव्याने स्विकारणाऱ्या ऍड. शुभा पिल्ले यांनी सांगितले.
भोसरी येथे पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजच्या सभागृहात बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे, उद्योजक अजय साळुंखे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्यभरातील जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा या पदाचा पदभार ऍड. शुभा पिल्ले यांनी स्विकारला. याचे नियुक्‍त पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. बहुजन रयत परिषदेच्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी दिल्याबद्दल ऍड. पिल्ले यांनी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे आभार मानले.