Advertisement
मंगळवेढा : "आधारवड" वडील असताना मायेची सावली म्हणून आम्हाला जपणाऱ्या आमच्या आई "अनुराधा" या आजही आमच्या मध्ये आहेत. त्यांच्या नंतर "आधारवडा"स त्यांचीच एक पारंबी म्हणून सोबत देण्याचा प्रयत्न करीत आहे. याच माझ्या माऊलीची जयंती निमित्त
शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्यावतीने बहुजन रयत परिषदेने "स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंती" दिनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले असल्याचे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमल साळुंखे - ढोबळे यांनी सांगितले.
मंगळवेढा येथील शिशुविहार समोरील शाहु मैदानावर मंगळवार (ता.29,नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजता कीर्तन कार्यक्रम होणार आहे. सोलापूर, मंगळवेढातील तमाम जनतेचे स्मरण कार्यक्रमास यावे, अशी विनंती ॲड. कोमल साळुंखे - ढोबळे यांनी केली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे पत्रकाचे प्रकाशन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा
माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, प्राचार्य चिदानंद माळी,मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार,मुख्याध्यापक प्रवीण गुंड,अंबादास पांढरे,जयंत डोलारे,कृष्णदेव चौगुले,औदुंबर ढावरे,राहुल चेळेकर आदी उपस्थित होते.

