Advertisement
पुणे : पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं, पण या आंदोलनात महिला कार्यकर्त्याने गोंधळ घातला.
पुण्यात आंदोलनादरम्यान शिंदे गटातील महिलेने राहुल गांधी समजून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना वेळीच ही चूक लक्षात आली आणि त्यांनी या महिलेला रोखलं. त्यानंतर राहुल गांधी कोण आहेत, हे या महिलेला दाखवून दिले. या गोंधळाचा व्हिडिओ समोर आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेतल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधींनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा भाजप, मनसे आणि शिंदे गटाकडून निषेध नोंदवला गेला. तसंच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणीही केली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे मनसेही राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे.
