#

Advertisement

Wednesday, November 23, 2022, November 23, 2022 WIB
Last Updated 2022-11-23T12:35:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

भावना गवळींचे राऊतांविरोधात गंभीर आरोप

Advertisement

मुंबई :  मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.
भावना गवळी यांनी म्हटलं आहे की, मी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांच्यावर या प्रकरणात  गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी भावना गवळी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी मी मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे नाव घेऊन लोकसभेत गेलो, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही विकलो गेलो नाही. हे कृत्य घृणास्पद असल्याचं म्हणत त्यांच्या कुटुंबियांबाबत असं झालं असतं तर चाललं असतं का? असा सवाल भावना गवळी यांनी उपस्थित केला आहे.