#

Advertisement

Wednesday, November 23, 2022, November 23, 2022 WIB
Last Updated 2022-11-23T12:45:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश

Advertisement

मुंबई : गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीकरिता 1 व 5 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देणार आहे. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे.