#

Advertisement

Saturday, November 19, 2022, November 19, 2022 WIB
Last Updated 2022-11-19T10:24:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिवसेना युवासेनेत मोठं खिंडार....

Advertisement


मुंबई : ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे उघडपणे दिसत आहे. मागच्या चार महिन्यांपासून उद्धव ठाकरे सेनेवर आरोप करत अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेला नारळ दिला. ठाकरे गटाचे आऊगोईंग सुरू असताना आणखी एक धक्का शिवसेनेला बसला आहे. आता यंग ब्रिगेडही नाराज असल्याचे आता उघड झाले आहे. युवा शिवसेनेतील युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे. 
शिवसेनेमध्ये दोन गट पडले असल्याने नेत्यांसबोत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का दिला आहे.