Advertisement
बारामती : राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते, असा सवाल असा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर राजकीय आखाडा तापला आहे. भाजप आणि मनसे आंदोलनं करत आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद टीकास्त्र सोडले आहे. माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे त्यामुळे आपण लढतो. पण सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. राहुल गांधींचा विरोध कमी होते पण शिंदे गटाचे काही लोक, भाजप आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.
