#

Advertisement

Saturday, November 19, 2022, November 19, 2022 WIB
Last Updated 2022-11-19T10:30:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज...

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातही  उत्तर प्रदेश सारख्या लव्ह जिहादविरोधी कायद्याची गरज आहे, असं चित्र वाघ यांनी म्हटलं आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, श्रद्धा वालकरची घटना  अंगावर काटा आणणारी आहे, यातून तरुण पिढीने धडा घेतला पाहिजे. हिंगोलीत घडलेल्या  घटनेसारख्या घटना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहेत. जबरदस्तीने धर्मांतरण करणे, फूस लावून पळवून नेणं अशा केसेसमध्ये त्या मुलींना त्या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 
दरम्यान, त्यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातसुद्धा उत्तर प्रदेश सारखाच लव्ह जिहादविरोधी कायदा करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.  अशा घटनातून तरुण पिढीने बोध घ्यावा. तसेच अशा केसेसमध्ये अडकलेल्या त्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची गरज असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.