#

Advertisement

Saturday, November 19, 2022, November 19, 2022 WIB
Last Updated 2022-11-19T10:10:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राज्यपाल कोश्यारीं पुन्हा बोलले.... 'शिवाजी तर जुने झाले'

Advertisement

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे या ना त्या विधानामुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. 'आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ.गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं विधान राज्यपालांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. 
औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी बोलताना राज्यपालांनी नवी विधान केलं. 
'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.