Advertisement
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करतील आणि राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती भीमशक्तीची युती होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण या चर्चांमध्ये आता वेगळाच ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृह येथे या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.
इंदू मिलच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचा मेसेज मला कालच आला. राजगृहाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत इंदू मिलच्या स्मारकाबाबत चर्चा झाली. मुंबईमध्ये 14 एकर जागा आहे. मुंबई भारताचं इंटरनॅशनल सेंटर आहे. काँग्रेस आणि त्यानंतरच्या सरकारमध्ये झालं नाही. तुमच्या कार्यकाळात त्या 14 एकर जागेमध्ये जर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर काढता आलं, तर त्याचा प्रयत्न करावा, याबाबत 15-20 मिनिटं चर्चा झाली, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
