Advertisement
जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसें विरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र याविरोधात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यानं खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे एकनाथ खडेस यांच्यापुढील आव्हान मात्र आता वाढले आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवता येणार नाही असा दावा एकनाथ खडसेंनी केला . त्यानंतर याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. खडसेंचा हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
