#

Advertisement

Monday, November 7, 2022, November 07, 2022 WIB
Last Updated 2022-11-07T11:41:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांना डिस्चार्ज, तर छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल झाले आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गेल्या 3 दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी करू नये असं आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलं आहे. 
दरम्यान, शरद पवार यांना ब्रीज कॅंडी हॉस्पिटलमध्ये 31 ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. 2 नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. पण, तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला नाही. अशातच शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचे मंथन शिबीर पार पडले. या शिबिराला डॉक्टरांच्या टीमसह शरद पवार हे हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले होते. तब्येत बरी नसल्यामुळे शरद पवार यांनी भाषण सुद्धा केलं नव्हतं. त्यांचं भाषण हे दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं होतं. अखेर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.