#

Advertisement

Monday, November 7, 2022, November 07, 2022 WIB
Last Updated 2022-11-07T12:22:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शाहू शिक्षण संस्थेचे नाव वैष्णवी हिने केले उज्ज्वल

Advertisement

महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेत राज्यात मिळवला तिसरा क्रमांक
वरळी : महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा वरळी येथे झाली. यामध्ये नेमबाजी या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये शाहू शिक्षण संस्था,पंढरपूर संचलित माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनियर कॉलेज येड्राव-खवे शाखेतील वैष्णवी महादेव जाधव (इयत्ता12 वी, विज्ञान) हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावीत शाहू शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
मंगळवेढा तालुक्‍यातील जित्ती गावतील विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवी महादेव जाधव हिने मिळविलेल्या राज्यस्तरीय यशामुळे राज्यात मंगळवेढा तालुक्‍याचा नावलौकिक झाला आहे. वैष्णवी जाधव हिच्या या यशाबद्दल शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणरावजी ढोबळे, विद्यमान अध्यक्ष तथा महात्मा फुले सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष अब्राहम आवळे, वाघोलीचे चेअरमन अभिजित ढोबळे, प्रशासनाधिकारी क्रांती आवळे-ढोबळे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंखे-ढोबळे, मार्गदर्शक अजय साळुंखे, संस्थेचे सचिव सिद्राम जावीर, प्राचार्य विश्वंभर काळे, क्रिडाशिक्षक प्रशांत यादव, एम.एस. माळी, उमराणी सर तसेच कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेतर वृंद यांनी वैष्णवी जाधव हिचा सत्कार करून भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.