#

Advertisement

Monday, November 7, 2022, November 07, 2022 WIB
Last Updated 2022-11-07T11:31:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सुषमा अंधारे विरुद्ध चित्रा वाघ : भाजपकडूनही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

Advertisement

मुंबई : शिवसेनेकडून 10 ऑक्टोबरला महाप्रबोधन यात्रा सुरू झाली. ही यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरू झाली. या यात्रेत सुषमा अंधारेच्या नेतृत्त्वात राज्यात सभा झाल्या. तर यानंतर आता भाजपकडूनही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्यात येणार आहे.  एकंदरीतच सुषमा अंधारे विरुद्ध चित्रा वाघ यारुपाने शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला भाजप प्रत्युत्तर देणार असे चित्र आहे.
तीन दिवसांपूर्वीच भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लगेचच त्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ होत आहे. राजमाता जिजाऊंना सिंदखेडा राजा येथे अभिवादन करुन या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करण्यात येणार आहे, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केली आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सभा घेतल्या. यानंतर आता भाजपकडून चित्रा वाघ यांना मैदानात उतरवले जाणार आहे. त्यांच्या नेतृत्त्वात 7 नोव्हेंबरपासून भाजपच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होणार आहे.