Advertisement
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. आपण कणकवलीत राणेंच्या विरुद्ध शब्दांना आवर घातला नाही. जे लोक घाबरट असतात त्यांना गुंडशक्तीचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या विरुद्ध आम्ही रणरागिणीच काफी आहोत, असा दमही त्यांनी भरला.
किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का, ईडीने त्यांना ईडीने कंत्राटी कामगार म्हणून नेमले आहे का, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना डिवचलं. तसेच नारायण राणे खतम, असे म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांना राणेंना मंत्री पद मिळाल्यानंतर मुंबईत राणेंना पायघड्या टाकणारे तेच किरीट सोमय्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
इतकेच नव्हे तर भाजपने त्यांना समजून घ्यावे, भाजपने मंत्री पद देऊन त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे, असे सांगतानाच अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे चुकलेलं आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोपर खळी लगावली.
