#

Advertisement

Thursday, November 17, 2022, November 17, 2022 WIB
Last Updated 2022-11-17T10:41:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नितीन गडकरींची तब्येत बिघडली : स्टेजवर आली चक्कर

Advertisement

दिल्ली :  भाजपचे नेते  आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत मंचावर अचानक बिघडली झाली. गडकरी यांची शुगर कमी झाल्यामुळे मंचावर चक्कर आली आणि ते कोसळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.  तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आलं आहे.  सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.
नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. आज सिलिगुडी इथं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींच्या शुगरचे प्रमाण अचानक कमी झाले. त्यामुळे त्यांना चक्कर आली. तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आलं. 3  वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नितीन गडकरी यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. नितीन गडकरी यांची ECG केलं जाणार आहे.  सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे.