#

Advertisement

Monday, November 28, 2022, November 28, 2022 WIB
Last Updated 2022-11-28T11:09:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बैठकीत पुढे बसण्यावरून आमदारांत नाराजीनाट्य

Advertisement


मुंबई : मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे होत आहे. या बैठकीत भाजपचे आमदार कालिदास कोळंबर यांनी जागेवरून नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई शहरातील सर्व आमदार आणि खासदार या बैठकीकरता उपस्थित झाले आहेत. टॉप ऑर्डरनुसार आमदार बसवण्यात आलेले नसल्याने कालिदास कोळंबकर यांनी नाराजी भर बैठकीत ऐकून दाखवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी आधी बसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सिनिअर आमदारांना प्रोटोकॉलनुसार पुढे बसवण्यात यावं, अशी मागणी आमदार कालिदास कोलंबकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. कालिदास कोलंबकर यांना या बैठकीमध्ये शेवटी बसवलं असल्यामुळे त्यांना शेवटी प्रश्न विचारावा लागत असल्यामुळे कालिदास कोळंबकर नाराज झाले आहेत.
तर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतर, पुढच्या वेळी बैठकीत याचा विचार केला जाईल, असे उत्तर त्यांनी दिले. बैठकीला सुरुवात झाली आहे. मुंबई शहरातील नागरी समस्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. तर या बैठकीला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांची गैरहजेरी आहे.