#

Advertisement

Saturday, November 19, 2022, November 19, 2022 WIB
Last Updated 2022-11-19T10:40:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"त्याची" किंमत मला मोजावी लागली...!

Advertisement

औरंगाबाद : ' डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कालखंड आठवतोय. अनेक संघर्ष झाले. त्याची काही किंमत मला मोजावी लागली. दुसर विद्यापीठ उभं राहील त्याचा भाग मला होता आलं' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यापीठाच्या नामांत्तर लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला.
औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांत्तर लढ्यात सत्तेतून पायउत्तार व्हावे लागले होते. त्या आठवणींबद्दल उजाळा दिला.  'देशाला घटनेच्या माध्यमातून संशोधित प्रणाली दिली. बाबासाहेबांनी या भागात शैक्षणिक प्रगती नसताना त्यांनी लक्ष घेतला. मोलाची कामगिरी केली. त्या कालखंडात एक मर्यादा होत्या. शैक्षणिक संस्था म्हणलं की अडचणी होत्या. त्यात औरंगाबादला शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा त्यांच्या निर्णयाने शिक्षणाचे मोठे जाळे उभे झाले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं कार्य केलं. अनेक संघर्ष झाले. त्याची काही किंमत मला मोजावी लागली. दुसर विद्यापीठ उभं राहील त्याचा भाग मला होता आलं, असं पवार म्हणाले.