Advertisement
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे. राज ठाकरे यांनी त्यांची ही स्टाईल तशीच ठेवायला पाहिजे. मात्र, मागच्या काही दिवसांपासुन राज ठाकरे स्टाईल कुठं तरी भाजपाची स्टाईल झाल्यासारखं राज्यातल्या जनतेला वाटत असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी स्वत:ची मत ठामपणे मांडावी. महाराष्ट्राच्या हिताची मतं त्यांनी मांडवे. महाराष्ट्राच्या थोर व्यक्ती आणि महाराष्ट्राच्या विचारांचा अवमान झालाय याबद्दल मत व्यक्त करावं अस आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे. महाष्ट्राने देशाला दिशा दिली आणि इथं महाराष्ट्राचा वापर इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याचा घणाघाती आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
राज्यातल्या युवकांचे भविष्य घडणा-या नोक-या बाहेरच्या राज्यात जात असताना राज्यातील युवकच आपले व्यवसाय बंद ठेवुन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या हाकेला रोहित पवारांनी दुजोरा दिला आहे.
