Advertisement
मुंबई : मंत्रालयात तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र मंत्रालयाला लावलेल्या संरक्षक जाळीमुळे मोठा अनर्थ टळला. हा तरुण वरून पडल्यानंतर जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले आहे. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. या सर्व प्रकारामुळे काही काळ मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न कराणारा हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. या तरुणाने यावेळी आपल्या घरच्यांवर देखील आरोप केले आहेत.
