#

Advertisement

Thursday, November 17, 2022, November 17, 2022 WIB
Last Updated 2022-11-17T10:54:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

हिंमत असेल तर "भारत जोडो यात्रा" आडवून दाखवा : राहुल गांधी

Advertisement

अकोला : सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. अकोल्यामध्ये पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. सावरकरांनी इग्रजांना पत्र लिहीलं. सावकरांनी पत्राच्या माध्यमातून माफीनामा सादर केला. त्यांनी इंग्रजांची मदत केली असं वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. सोबतच हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असं आव्हानही राहुल गांधी यांनी भाजपाला केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. आंदमानात असताना सावरकर यांनी इंग्रजांना पत्र लिहीलं. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या पण माझी सुटका करा असं सावरकर यांनी या पत्रात म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यावरून राजकारण तापलं असतानाच आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. राज्यात रोजगार नाही. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्यानं तरुण पिढी नैराश्यात आहे. महागाई वाढली आहे. सरकारी शाळा बंद  करण्याचा  कार्यक्रम सुरू झाला आहे. सरकारी शाळा बंद झाल्या तर गरिबांनी कुठे शिकायचं असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.