Advertisement
सोलापूर : सोलापूर
महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व मुलींसाठी विविध
आठ प्रकारचे उपयुक्त प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात येत आहेत, त्यासाठी इच्छुक
महिला व मुलींचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यास दि. 7 नोव्हेंबर पासून सुरुवात
करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त
विद्या पोळ आणि नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या
मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध कोर्सेसचे
प्रशिक्षण देण्यात येत आहेत.
सोलापूर शहरातील महिला व मुलींसाठी एमएस सीआयटी,
टॅली, बॅंकिंग, सोलर पॉवर सिस्टीम, लेडीज टेलरिंग, ब्युटी पार्लर, मार्शल आर्ट
कराटे आदी 8 कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. यासाठी 14 ते 45 वर्ष
वयोमर्यादा आहे. 3 महिन्यांच्या कालावधीचे हे कोर्स आहेत. पिवळे व केसरी कार्ड
असणाऱ्या महिला व मुलींना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
शैक्षणिक पात्रतेचे
प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधार कार्ड, फोटो सोबत अपलोड करणे आवश्यक आहे. पात्र महिला
व मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या
www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 7 ते 15 नोव्हेंबर 2022
पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत पात्र-अपात्र
अर्जदारांची यादी महापालिकेच्या याच संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल, तरी
इच्छुक पात्र महिला व मुलींनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन महापालिका महिला व
बालकल्याण समितीचे अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले आहे.
