#

Advertisement

Tuesday, November 29, 2022, November 29, 2022 WIB
Last Updated 2022-11-29T11:25:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बेळगाव न्यायालयाचे संजय राऊत यांना समन्स

Advertisement


मुंबई :  बेळगाव न्यायालयानं संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. 2018 मध्ये त्यांनी बेळगावात सीमावादावरून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. यावरून आता त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना एक डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समन्सनंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सीमावादावर काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कन्नड रक्षण वेदिकेवर कधी कारवाई होणार? सीमा प्रश्नासाठी आता मुख्यमंत्री पुन्हा आसामला जाऊन नवस बोलणार आहेत का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. 
बेळागावला बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.