#

Advertisement

Tuesday, November 29, 2022, November 29, 2022 WIB
Last Updated 2022-11-29T11:21:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"आरपीआय"च्या कोकण अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी

Advertisement


ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंगे यांनी याबाबतचा निर्णय घेतला. जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना शिवीगाळ केल्याची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यानंतर त्यांनी स्वपक्षीय नेत्यांवर देखील टीका केली होती. यासंबंधीचा ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे जगदीश गायकवाड यांची पक्षातून करण्यात हकालपट्टी करण्यात आली आहे. 
दरम्यान, आरपीआय पक्षाच्याच 
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विवाहित महिलेसोबत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. विवाहित महिलेच्या पतीला धमकावून तिला पतीपासून विभक्त केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच तुझ्या मुलांना सांभाळेल, तुझ्या सोबत लग्न करेल, तुला घर देईल असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कांबळे याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.