#

Advertisement

Tuesday, November 1, 2022, November 01, 2022 WIB
Last Updated 2022-11-01T11:32:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

रवी राणा यांची ही पहिली वेळ आहे, त्यांना माफ करतो !

Advertisement


अमरावती : रवी राणा यांची ही पहिली वेळ आहे. त्यांना माफ करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद आहे नाहीतर आम्हालाही हातपाय हालवावे लागले असते. माफी मागितली त्याचेही आभार आहेत. तुम्ही दोन पाऊल गेले. आम्हीही चार पाऊल मागे जातो, असे ते यावेळी म्हणाले. यानंतर काही झालं तर प्रहारचा वार कसा असतो, ते आम्ही दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच या सगळ्या आंदोलनात मागच्या 7 दिवसात अनेकांनी ज्या भावना व्यक्त केल्या तसेच ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचे आभार मानतो, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.
अमरातवतीमध्ये शक्तीप्रदर्शन करत बच्चू कडू यांनी मोर्चाला संबोधित केले. आम्ही उठाव केला आहे. शरद पवारांनी 2014 मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तो त्यांच्या सोयीचा होता. त्या विषयाचा होता. पण ते म्हणतात ना, "गरिबाची पोरगी पळाली तर ती पळून गेली आणि श्रीमंताची पोरगी पळून गेली तर ते लव्ह मॅरेज" म्हणजे गरिबांचं कारटं आणि श्रीमंताचं मग, साहेब आहे का तो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
फेसबुकच्या कमेंटवर जाऊ नका. आजकाल अर्धा सोशल मीडियासुद्धा पैशानं चालतो. 500-600 लोकांना जर पैशे दिले तर आणि त्यांना कमेंट करायला सांगितलं तर काय वेळ लागणार? खरी बाजू समोरच येत नाही. सध्या मला जितके मीडियावर दाखवण्यात येत आहे तितके जर शेतकरी आंदोलनात दाखवले असते तर 5-6 मागण्या पूर्ण झाल्या असत्या, असेही ते यावेळी म्हणाले.