#

Advertisement

Thursday, December 1, 2022, December 01, 2022 WIB
Last Updated 2022-12-01T11:36:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

'बोरिंग यार, कुछ नया बोलो' : सुप्रिया सुळे

Advertisement

मुंबई : 'जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादीची स्थापन झाल्यापासून सुरू झाले' अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पण, 'बोरिंग यार, कुछ नया बोलो' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पण, आता हे बोरिंग झालं आहे, 'कुछ नया बोलो' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. 'मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी केली. या प्रकरणी त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. मग महागाई असेल किंवा इतर विषयावर चर्चा करणे गरजेचे आहे', असा टोलाही सुळे यांनी लगावला. 
कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील गावांवर दावा केला आहे. त्यांची विधानं सुरूच आहे. पण हे सरकार का करतंय हे कळत नाही. महाराष्ट्राच्या विरोधात वारंवार होतंय.देशात ज्या गोष्टी होत नाही त्या इथे का होत आहे? महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. यामागे अदृश्य हात कोणाचा आहे हे माहित नाही. असा टोला सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.