Advertisement
पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पूर्वी असे नव्हते. ठाकरेशाही आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपणारे राज ठाकरे आता बदलले आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केले.
शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर हीच नाव घेतात, शरद पवार महाराजांचं नाव का घेत नाहीत, असा टोला राज ठाकरेंनी पवारांना लगावला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंसंदर्भात आपले मत व्यक्त केले.
पंढरपूरच्या कॉरिडॉरला हा राष्ट्रवादीचा पूर्णपणे विरोध असेल. व्यावसायिक व घरदार पाडून कुठलाही विकास करू नये वारकऱ्यांना अपेक्षित असणारा विकास करावा, अशी भूमिकाही यावेळी रूपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली.
