Advertisement
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्यांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा मिळाला होता. पण नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आहे. या प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं वॉरंट जारी केलं आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जारी केलेलं हे वॉरंट बेलेबल असलं तरी येत्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी जर दोघेही गैरहजर राहिले तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकतं.
