Advertisement
पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार की राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबापेठमध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तर पिपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अर्ज भरण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
३१ जानेवारी अधिसूचना
७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
८ फेब्रुवारी अर्जांची छाननी
१० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार
मतदान २७ फेब्रुवारी
निकाल २ मार्च
