#

Advertisement

Wednesday, January 18, 2023, January 18, 2023 WIB
Last Updated 2023-01-18T12:37:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरेंचं नाव पत्रिकेत नाही?

Advertisement


मुंबई : विधानभवनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. पण, या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्यामुळे वाद पेटला आहे. पण 'हा कार्यक्रम सरकारचा नसतो, विधिमंडळ हा कार्यक्रम ठरवतो असतो' असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचं टाळलं.
23 जानेवारीच्या विधानभवनातल्या बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण होणार आहे. पण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही. या प्रकारावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, 'उद्धव ठाकरे यांचं नाव पत्रिकेमध्ये नाही, याबद्दल मला काही कल्पना नाही. हा कार्यक्रम सरकारचा नसतो, विधिमंडळ हा कार्यक्रम ठरवतो असतो. त्याच्यामुळे मला याबद्दल काही माहिती नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.