#

Advertisement

Wednesday, January 25, 2023, January 25, 2023 WIB
Last Updated 2023-01-25T13:05:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मिशन 2024 साठी भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लान !

Advertisement


नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा मास्टर प्लॅन बनवला आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचण्याचा कार्यक्रम राबवणार आहे. एवढेच नाही तर भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याकांच्या परिषदेसाठी भाजपचीही मोठी योजना असून या परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करू शकतात, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आपल्या स्कूटर यात्रेत मुस्लिम धार्मिक नेत्यांचाही समावेश करू शकतो, ज्यांच्या रणनीतीवर पक्षात चर्चा होत आहे. भाजपच्या योजनेनुसार, भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 5000 मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना पक्षाशी जोडेल. एवढेच नाही तर मुस्लिम धर्मगुरूंना जोडून भाजप केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा प्रचार तळागाळापर्यंत नेणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात पोहोचण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर भाजप अल्पसंख्याक स्नेहसंमेलन आयोजित करणार आहे.