Advertisement
चिंचवडच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. उमेदवारासंदर्भात या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झालाच तर चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा अशी आमची भूमिका असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काल आमची इतर सहकाऱ्यांसोबत देखील चर्चा झाली, मात्र निवडणूक लढायला काही हरकत नाही असाच सूर या बैठकीतून उमटला असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
