#

Advertisement

Thursday, January 19, 2023, January 19, 2023 WIB
Last Updated 2023-01-19T12:10:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

पार्थ पवार अस्वस्थ आहेत म्हणून....

Advertisement

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी शंभूराज देसाईंची भेट घेतली आहे. शासकीय बंगल्यावर दोघांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास 15 ते वीस मिनिटे चर्चा झाली. दरम्यान पार्थ पवार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीवरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामतीमधील अॅग्रो त्यांच्याकडे आहे. तसेच रोहित पवार आता मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थ पवार यांची असेल, असेही ते म्हणाले. हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मतांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, याबाबतचे शल्य त्यांच्या मनात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.