Advertisement
मुंबई : आज अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी प्रसारमाध्यमांना टोला लगावला आहे. 'खूप प्रांजळपणाने हात जोडून सांगते, आमच्या घराबद्दल बोलल्याशिवाय बातमी होत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. भाजपकडे मोठ्या नेत्यांची फळी होती. मला कधी-कधी मोदीजींची काळजी वाटते देशात कुठलीही निवडणूक लागली, अगदी ग्रामपंचायतीची तरीही मोदीजींनाच यावं लागत. मोदी एकमुखी नेतृत्व आहे, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेल तरीही मंत्री भेटत नाही. कुणाकडे कुठल मंत्रालय आहे हे पण कळत नाही. एकही महिला मंत्री नाही अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.शिवाय टीव्ही पण बीझी राहात नाही' असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
